Mumbai Local Train Chain Bomb explosion Threat Call To Police unknown person Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आलेल्या फोनने राज्यात खळबळ

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train Bomb Explosion Threat Call: मुंबई पोलिसांना येणाऱ्या धमक्यांचे फोन काही थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. आज म्हणजेच रविवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन खणाणला. मुंबईतील लोकल ट्रेनममध्ये लवकरच साखळी बॉम्बस्फोट होणार, अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. इतकंच नाही तर, आपण लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची धमकी येताच मुंबई पोलिस सतर्क झाले असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले.

त्यावेळी नियंत्रण कक्षात कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस शिपायाने फोन करणाऱ्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली. कोणत्या ट्रेनमध्ये आणि कुठे बॉम्ब ठेवला? असं महिला पोलिसाने या व्यक्तीला विचारलं. त्यावर संबधित व्यक्तीने कोणतंही उत्तर दिलं नाही. मात्र, त्याने कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली.

पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, आपण जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचे सांगत त्याने फोन कट केला. पोलिसांनी त्याच्या फोनचे लोकेशन ट्रॅक केले असता, या व्यक्तीने जुहूच्या शाह हाऊस मोरगांव येथून फोन केल्याचं समजतंय.

कालांतराने फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा मोबाइल बंद केला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबधित स्थानकावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत कळवले आहे. लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळताच एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phullwanti Movie: 'हिंदवी स्वराज्य माझ्या राज्याचं होतं, त्यांच्या दरबारात आया-बहिणांना मान, सन्मान दिला जायचा पण आता...' फुलवंतीचा ट्रेलर रिलीज

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT