Mumbai Central Local Train 
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत; नोकरदारांचे हाल, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

Mumbai Central Local Train: मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील पुन्हा एकदा विस्कळीत झालीय.

Bharat Jadhav

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालीय. या मार्गावरील लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. लोकल रेल्वे उशिराने धावत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी होतेय. प्रवाशांच्या गर्दीवर आरपीएफ रेल्वे पोलिसांकडून नियंत्रण मिळवलं जात आहे. लोकल ट्रेन वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल हो आहेत.

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम

दरम्यान याआधी वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम झाला होता. आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये पत्रा अडकल्याने रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली होती. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं एका शेडचा पत्रा उडून ओव्हर हेड वायरवर येऊन पडला. यामुळे कसऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. एक लोकल १५ मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेसला ८ मिनिटे उशिर झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT