Mumbai Local Train Mega Block Sunday  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांच्या प्रवासाचा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द

Mumbai Local Mega Block on Sunday : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या म्हणजेच रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज म्हणजेच रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान, लोकलच्या काही फेऱ्या रद्द तर काही विलंबाने धावतील. जलद मार्गावरील लोकलच्या फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप-डाऊन, ठाणे ते पनवेल अप-डाऊन मार्गावरील लोकल बंद राहतील. ब्लॉक कालवधीत सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि नेरुळ बेलापूर मार्गावरील लोकल सुरु राहतील.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

पश्चम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप आणि डान धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गाने वळवण्यात येतील. या वेळेत बोरिवली १, २, ३ आणि फलाट क्रमांक ४ वरून कोणतीही लोकल धावणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT