Mumbai AC Local Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : एसी लोकल चक्क उघड्या दरवाज्यांसह धावली; अंधेरी ते भाईंदर स्थानकादरम्यानचा प्रकार

चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकल दरवाजे उघडे ठेवूनच धावली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Satish Daud

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांची पसंती मिळत आहे . यामुळे सध्या एसी लोकलमध्ये (Mumbai) प्रचंड गर्दी वाढली आहे. अशातच चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकल दरवाजे उघडे ठेवूनच धावली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumbai AC Local News)

सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चर्चगेट वरून विरारसाठी सुटलेली लोकल अंधेरी स्थानकात पोहोचली. त्यानंतर लोकलचे दरवाजे उघडे राहिले. दरवाज्यावरील रबर निसटल्याने सोमवारी अंधेरी ते भाईंदर दरम्यान एसी लोकल दरवाजे उघडे ठेवूनच धावली. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अंधेरी स्थानकातून गाडीत प्रवेश करत दरवाज्यांची दुरुस्ती केली. दरवाजा बंद करणारे गॅस किट रबर दरवाजावरून निसटले आणि ते दरवाजात अडकले. त्यामुळे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने उघड बंद होऊ शकले नाहीत. यानंतर पुन्हा भाईंदर स्थानकात अडकलेले रबर काढून पुन्हा एकदा स्वयंचलित पद्धतीने हे कार्यरत झाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT