Mumbai Railway  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway : रेल्वे अपघातात 22 वर्षांत 72,000 मृत्यू; सुन्न करून टाकणारा रिपोर्ट आणि कारणं

Mumbai Railway accident report : मुंबई लोकल ट्रेन अपघाताचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. २२ वर्षांत ७२ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai News : मुंब्रा येथे झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातानंतर मुंबईची लाईफलाइन डेथलाइन का होतेय? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यातच लोकल ट्रेन अपघातामधील मृतांचा आकडा आणि कारण ऐकूण सर्वंनाच धक्का बसेल. रेल्वे अपघातामध्ये मागील 22 वर्षांमध्ये तब्बल ७२ हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, यामधील एक तृतीयंश मृतदेह बेवारस आहे. त्यांची ओळख पटली नाही, अथवा त्यांच्या कुटुंबियांचा शोध रेल्वे पोलिसांना घेता आला नाही, याबाबतचा रिपोर्ट टाईम्स ऑफ इंडियानं दिला आहे. रेल्वे अपघातात इतक्या लोकांचा मृत्यू का होतोय? याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई आणि उपनगारत मागील १५ वर्षांमध्ये झालेल्या रेल्वे पटरीवर मृत्यू झालेल्यांमद्ये एक तृतयांश मृतदेह बेवारस आहे. याबाबतची माहिती आरटीआयमधून मिळाली. टाईम्समधील रिपोर्ट्सनुसार, मागील १० ते १५ वर्षांमध्ये लोकल ट्रेनच्या अपघात मृत्यू झालेल्या एकूण (४६९६९) प्रवाशांपैकी ३१ टक्के (१४५१३) जणांची ओळख पटली नाही, त्याची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मृताच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचता आले नाही. ऑर्थोपेडिक डॉ. सरोश मेहते यांनी आरटीआय याचिका टाकली होती. त्यामधून 2019 नंतर बेवारस मृतदेहांची संख्या वाढत असल्याचे समोर आले.

रेल्वे अपघाताचे नेमकं कारण काय ?

२००२ ते २०२४ या कालावधीत, २२ वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे रेल्वे मार्गावर ७२,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू हे रेल्वे रुळ ओलांडताना धडकेमुळे झाले. आकडेवारीनुसार २०१२ पासून दरवर्षी मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे. फक्त २०२२ हा अपवाद ठरला. कोरोना महामारीमुळे घराकडे जाताना अनेकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

आरटीआय कार्यकर्ते डॉ. मेहता यांनी सांगितले की, रुळ ओलांडणे आणि ट्रेनमधून खाली पडणे यासारख्या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरवाजे बंद असलेले लोकलचे डबे तयार केल्यामुळे हे अपघात थांबवता येणार नाहीत. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रेल्वे पूल आणि एस्केलेटर उभारले जात आहेत. पण तरीही दरवर्षी मृत्यूंची संख्या जास्तच आहे. रेल्वेच्या ‘शून्य मृत्यू’ मिशनसाठी अजून खूप काळ बाकी आहे.

दुर्घटेनेतील मृताची ओळख पटवणं कठीण -

रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवणं आव्हानात्मक असल्याचे रेल्वे पोलिसांन सांगितले. रेल्वेची जोरात धडक झाल्यानंतर मृतदेह छिन्नविछिन्न झालेले असल्यामुळे ओळख पटवणं अशक्य होतं. मृतदेहाजवळ मोबाइल फोन अथवा ओळखपत्रही सापडत नाही, त्यामुळे अनेकदा अपघात मृत्यू झालेल्या मृताची ओळख पटवणं कठीण जाते, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जीआरपीकडून शोध नावाची वेबसाइट चालवली जात होती. शोध संकेतस्थळावर मृतांची छायाचित्र अथवा माहिती प्रसिद्ध केली जायची, त्याद्वारे कुटुंबंना शोध घेण्यास मदत होत होती. पण ही वेबसाइट बंद झाली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीचे छायाचित्र लावण्यात येत होते, पण त्यामुळे प्रवासांनाा त्रास होत होता म्हणून बंद करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

SCROLL FOR NEXT