Railway Mega Block Google
मुंबई/पुणे

Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Central Railway Mumbai Local Mega Block : मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्वाची सूचना आहे. २४ मे रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामध्ये मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन या मार्गावरी लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, २४ मे २०२६ रोजी अनेक अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मेन लाईन आणि हार्बर लाईवरील बऱ्याच लोकल सेवांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासाला बाहेर पडण्याआधी पुढील वेळापत्रक तपासून नियोजन करा.

माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगा ब्लॉक

मध्ये रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाउन स्लो मार्गावरील रेल्वे माटुंगा आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाण्याहून ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांवरील जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या सेवा १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर लाईनवरील अनेक फेऱ्या रद्द

हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, बेलापूर, वाशी, पनवेल आणि गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष लोकलची व्यवस्था

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत काही विशेष लोकल व्यवस्था केल्या आहेत. पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांनी विशेष लोकलची व्यवस्था केली आहे. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गी प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT