मुंबई: ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या ट्रान्स हार्बर लाईनवरील (Mumbai Trans Harbor Trains) वाहतुक तब्बल अडीच तास बंद होती. यानंतर रेल्वे प्रशासने वाहतुक सेवा पुर्ववत करण्यासाठी तात्काळ काम सुरू केले. आता ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली असून चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. तब्बल अडीच तासांनंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सेवा (Mumbai Local) पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत दिली आहे. (Mumbai Local Train Live Updates)
हे देखील पाहा -
आज, शनिवारी मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पण तांत्रिक अडचणीमुळे हजारो मुबंईकरांना काही तास तात्काळत प्लॅटफॉर्मवरच उभे राहावे लागले. दुपारी जवळपास पावणे एकच्या सुमारास कोपरखैरणे स्टेशन जवळ ओव्हरहेड वायरमध्ये (Overhead line) तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ स्टेशन दरम्यान लोकलसेवा (Local Train) ठप्प झाली होती, त्यामुळे शेकडो प्रवासी स्थानकांवर अडकून पडले होते. रेल्वेचे अधिकारी आणि अभियंते यांनी युद्धपातळीवर काम करत तांत्रिक समस्या सोडवली आणि लोकलसेवा पुन्हा सुरू केली. शिवाजी सुतार यांनी माहिती दिली की, "तांत्रिक बिघाड दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे, दुपारी ३:१० वाजेपासून ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.