Mumbai Central Local Train 
मुंबई/पुणे

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांची घोर निराशा! लोकल गर्दी कायम राहणार, शिफ्ट बदलाच्या प्रस्तावाला ८०० कंपन्यांकडून कसा दिला प्रतिसाद?

Mumbai Local News: लोकलची गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेने ८०० कंपन्यांना वेळा बदलण्याबाबत विनंती केली होती. या कंपन्यांपैकी किती कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला घ्या जाणून...

Priya More

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मध्य रेल्वे मार्गावर सतत होणारे अपघात आणि त्यामध्ये अनेक प्रवाशांचा नाहक बळी जात आहे. गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करावा लागतो. प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला. मध्य रेल्वे मुंबईतील ८०० पेक्षा जास्त खासगी कार्यालयांसह शासकीय कार्यालय, महाविद्यालय आणि बँकांना आप्या कार्यलीन वेळेमध्ये बदल करण्यासाठी पत्र पाठवले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने केलेल्या विनंतीला काही कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेच्या वेळेत बदल करण्याच्या प्रस्तावासह मध्य रेल्वेने जवळपास ८०० पेक्षा जास्त कंपन्यांशी संपर्क साधला होता. या कंपन्यांना पत्र पाठवत मध्य रेल्वेने कामाच्या वेळेमध्ये बदल करण्याची विनंती केली होती. त्यापैकी फक्त ४६ कंपन्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर दररोज १,८०० हून अधिक लोकल ट्रेन धावतात. ज्यामध्ये एसी आणि नॉन-एसी ट्रेनचा समावेश आहे. ज्या गर्दीच्या वेळी पूर्ण क्षमतेने धावतात.

मध्य रेल्वे प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाददिलेल्या या ४६ कंपन्या प्रत्येकी २५ पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत नाहीत. त्यामुळे त्याच्या निर्णयाचा मोठा परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 'जोपर्यंत मोठ्या कंपन्या, ज्या शेकडो किंवा हजारो कामगारांना रोजगार देतात. त्या या उपक्रमात सहभागी होत नाहीत तोपर्यंत गर्दी कमी होण्याची शक्यता कमी आहे. मोठ्या कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तरच पीक-अवरच्या कालावधीत गर्दी कमी करण्यासाठी मदत होईल.

स्वप्नील निला यांनी पुढे सांगितले की, मुंबईच्या उपनगरीय वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी फ्लेक्झिबल किंवा उशिरा येणारे रिपोर्टिंग तास देण्याचे आवाहन करत आहे. गर्दीच्या वेळी गर्दी कमी करण्यासाठी विशेषतः सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत जेव्हा लोकल जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन धावतात. या कालावधीत जर कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या तर गर्दी कमी होईल. हा प्लान सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. कर्मचारी त्यांचे प्रवास अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT