मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आहे. मुंबईवरून अंबरनाथला जाणाऱ्या एका तरुणावर धावत्या लोकलमध्ये कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून अंबरनाथला जाणाऱ्या तरुणावर तीन प्रवाशांनी कोयत्याने हल्ला केला. या तरुणावर कोयत्याने अनेक वेळा वार करण्यात आले. ही घटना ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री १२:१० वाजता घडली. लोकलच्या जनरल डब्यात जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू होता. लोकल ठाकुर्ली स्टेशनवर पोहोचताच तीन प्रवाशांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला.
हल्लेखोर ठाकुर्ली स्टेशनवर उतरले आणि फरार झाले. कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी प्रवाशाला ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. जखमी प्रवाशाला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवासी प्रचंड घाबरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.