Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: बदलापूर- सीएसएमटी लोकलमधून गोमांस तस्करी, पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात

Beef Smuggling Attempt Foiled in Badlapur -CSMT Local Train: लोकलमधून गोमांस तस्करी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर- सीएसएमटी लोकलमध्ये गोमांस तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

बदलापूर-सीएसएमटी लोकलमधून गोमांस तस्करीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क लोकल ट्रेनमधून गोमांस तस्करी केली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्या तिघांना पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कल्याण पोलिस तपास करत आहेत.

बदलापूर-सीएसएमटी लोकलमधून गोमांस तस्करी केली जात असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तिघांना पकडून कल्याण रेल्वे स्थानकावर उतरवलं आणि त्यांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण रेल्वे पोलिसांनी या तिघांकडे असलेले गोमांस जप्त केले. या घटनेनंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

गोमांसाची तस्करी करणाऱ्या तिघांकडून कल्याण रेल्वे पोलिसांनी तब्बल १२ किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. या तिघांची पोलिस चौकशी करत आहेत. हे गोमांस कुठून आणले? हे गोमांस कोणाला द्यायला चालले होते? याचा कल्याण रेल्वे पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटिस

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT