Mumbai Local mumbra station Accident  Saam TV News
मुंबई/पुणे

Mumbai Local Accident : लोकल अपघातात ६ जणांचा मृत्यू कसा झाला, जबाबदार कोण? रेल्वेच्या स्पष्टीकरणामुळे तळपायाची आग मस्तकात जाईल

CSMT Kasara Local Train Accident: मुंब्रा-दिवा दरम्यान कसारा-सीएसएमटी लोकल अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वेच्या स्पष्टीकरणानुसार, गाड्या रिकाम्या असूनही प्रवासी दारात लटकत प्रवास करत होते. त्यामुळे दोन लोकल क्रॉस होताना धक्क्याने ते ट्रॅकवर पडले.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Accident Mumbra diva station : मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी 9:30 वाजता घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. हे प्रवासी नेमके कसे पडले आणि नेमकं काय घडलं होतं, याविषयीची धक्कादायक माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात फुटबोर्डवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन लोकल गाड्या एकमेकांना क्रॉस करताना धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. हा अपघात मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान घडला, जिथे सीएसएमटीकडे जाणारी फास्ट लोकल आणि कसाऱ्याकडे जाणारी लोकल एकमेकांना क्रॉस करत होत्या. स्वप्नील नीला म्हणाले की, दोन्ही गाड्यांवरील फुटबोर्डवर लटकलेले प्रवासी एकमेकांना धडकले, त्यामुळे आठ प्रवासी ट्रॅकवर पडले. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोघांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सकाळी 9:50 वाजता रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले. कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलच्या गार्डने हा अपघात घडल्याची तात्काळ माहिती दिली, ज्यामुळे बचावकार्याला गती मिळाली.

दुर्घटना का घडली ?

स्वप्नील नीला यांनी या अपघाताचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, फुटबोर्डवर प्रवास करणे आणि गाड्या रिकाम्या असतानाही दारात उभे राहण्याची प्रवाशांची सवय या दुर्घटनेचे प्रमुख कारण आहे. "बऱ्याच वेळा गाड्या रिकाम्या असतानाही प्रवासी दारात लटकतात. यामुळे अशा दुर्घटना घडतात," असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यावर जबाबदार व्यक्ती निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर पुढे काय?

स्वप्नील नीला यांनी सांगितले की, मध्य रेल्वेने लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) निर्मित लोकल गाड्यांमध्ये रेट्रोफिटिंगद्वारे हे दरवाजे बसवले जाणार आहेत. यामुळे फुटबोर्डवर प्रवास करणे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT