MNS News
MNS News Saam Tv
मुंबई/पुणे

'हिशोबात राहा नाहीतर संपवून टाकू'; उल्हासनगरात मनसे शहराध्यक्षांना धमकीचे पत्र

अजय दुधाणे

मुंबई: उल्हासनगरचे मनसे (MNS) शहराध्यक्ष बंडू देशमुख यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 'हिशोबात राहा नाहीतर संपवून टाकू!' असा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून, याप्रकरणी बंडू देशमुख यांनी विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मनसेच्या (MNS) स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले बंडू देशमुख हे गेल्या ५ वर्षांपासून मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा पुतण्या तन्मेष देशमुख हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा उल्हासनगर शहर सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बंडू देशमुख हे त्यांच्या लालचक्की परिसरातील ऑफिसमधून घरी गेले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्यांचा पुतण्या तन्मेष हा ऑफिस बंद करण्यासाठी आला असता त्याला ऑफिसच्या आत एक पत्र पडलेले मिळाले. हे पत्र उघडून पाहिले असता त्यावर "तू आणि तन्मेष हिशोबात राहा, नाहीतर दोघांना संपवून टाकू. जास्त मस्ती आली आहे तुम्हाला, खास करून त्या तन्मेषला.. समजावून ठेव त्याला!" असा मजकूर या पत्रात आहे. या प्रकरणी बंडू देशमुख यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बंडू देशमुख यांना यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे एक धमकीच पत्र आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता पुन्हा एकदा पत्र आल्यानंतर देशमुख यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना याबाबतची माहिती दिली. राजू पाटील यांच्याच सल्ल्यानुसार बंडू देशमुख यांनी पोलीस तक्रार केली असून, हे पत्र नेमके कुणी ठेवले? याबाबत अद्याप कुणावरही संशय व्यक्त करणे कठीण असल्याचे बंडू देशमुख म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्याचे मनसेचे(MNS) माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या मुलालाही अशाच पद्धतीने धमकीचे पत्र मिळाले होते. त्यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून धमकी देणाऱ्याला शोधून काढणे गरजेचे असल्याचे देशमुख म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT