Mumbai Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Accident News : परळ ब्रिजवर बाईक-ट्रकमध्ये भीषण अपघात, २ तरुणींसह तिघांचा जागीच मृत्यू

Accident on Parel Bridge News : दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. परळ ब्रिजवर हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली. बाईकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या डंपरवर बाईत धडकली.

दोन वाहनांची धडक इतकी जोरदार होती की बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर ट्रकच्या समोरील भागाचं देखील नुकसान झालं आहे. धडकेनंतर बाईकवरील तिघांना रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर जखमींना KEM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. डंपर चालकाने स्वत:पोलीस स्टेशनला जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.

मृतांची नावे

तनिषपतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT