MUMBAI LALBAUG ELECTRIC SHOCK saam tv
मुंबई/पुणे

लालबाग परिसरात भक्तांना विजेचा धक्का, चिमुकलीसह महिलेचा मृत्यू, एक गंभीर

Lalbaug Ganesh Festival Tragedy: मुंबईच्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. अशातच आता लालबाग परिसरात विजेचा शॉक लागून गणेशभक्तांचा जीव गेलाय.

Rohit Kadam

गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईच्या लालबाग परिसरातील गणेश मंडळांमध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. देशभरातून भाविक इथं गणरायांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र लालबाग परिसरात मोठी दुर्घटना घडली. काळाचौकीत महागणपतीच्या प्रवेशद्वारात शनिवारी रात्रीच्या सुमारास 6 जणांना पाण्याच्या स्टॉलच्या इथं विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या चिमुकलीसह एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर जखमी झालेल्या चार जणांपैकी तिघांची प्रकृती स्थिर असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी मृतांचे नातेवाईक आक्रमक झालेत. महागणपती मंडळाच्या हलगर्जीपणामुळेच घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय...

या दुर्घटनेप्रकरणी मंडळाविरोधात पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं मृतांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. दरम्यान उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत गणेशभक्तांची मोठी रेलचेल असते. अशा परिस्थितीत गणेश मंडळांकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. यावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत...

1. पूर्ण खबरदारी न घेताच घाईघाईने गणेश मंडळानं तयारी केली का?

2. गणेशोत्सवापूर्वी मंडळाच्या आसपासची वीजवाहिनीची सुरक्षितता तपासली गेली नाही का?

3. पाण्याचा स्टॉल आणि विद्युत उपकरणे लगत असताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झालं का?

4. प्रवेशद्वाराजवळ गर्दी असताना मंडळांचं बारीक लक्ष नव्हतं का?

दरम्यान, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतायेत. मात्र, या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. सण- उत्सव साजरा करताना विद्युत रोषणाई, तात्पुरते स्टॉल आणि लाखो भाविकांची गर्दी याचा मेळ घालताना 'सेफ्टी फर्स्ट'चे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र, सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष अनेकदा जीवावर बेतलं जातंय.. त्यामुळे काळाचौकीतील दुर्दैवी घटनेतून धडा घेऊन आता सार्वजनिक उत्सवांमध्ये 'इलेक्ट्रिकल आणि फायर सेफ्टी ऑडिट' बंधनकारक करणं गरजेचं बनलंय. नाहीतर बाप्पाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

कोस्टलवर BMW कारचा भीषण अपघात, BMW फुटबॉलसारखी हवेत उडाली

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

शिंदेंनी डाव टाकला; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT