Lalbaug cha raja 2022 first look : गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी गणपती मंडळांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचं सोमवारी सायंकाळच्या सुमारास अनावरण झालं. लाडक्या बाप्पाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Lalbaug cha raja 2022 first look Photo)
दरवर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण भारतात गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यंदा गणेश चतुर्ती ३१ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी केवळ मंदिरातच नाही तर, घरांमध्ये, सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. (Lalbaug Cha Ganpati Photo)
गणेशोत्सवात मुंबईतील लालबागच्या राजाचं (Lalbaugcha raja) दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतात. लालबागच्या राजाचं हे ८९ वं वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे. बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. तत्पूर्वी राजाची यंदाची गणेश मुर्ती मंडपात विराजमान झाली आहे. (Lalbaugcha Raja Che Photo)
दरम्यान, आज लालबागच्या राजाचं अनावरण झालं. यावेळी पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मूर्तीचं अनावरण होण्यापूर्वी पडदा उघडताना लोकांनी काऊंटडाऊन सुरु केलं, त्यानंतर जसजसा काऊंट कमी होत होता तसंतसा उपस्थितांमध्ये उत्साहाचं उधाणं आलं होतं. यावेळी अनेक फोटोग्राफर्स आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची धडपड पहायला मिळाली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.