Mumbai woman carried in sling to hospital during labour saam tv
मुंबई/पुणे

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Shocking Mumbai Incident: बाळंतिणीला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ एका कुटुंबावर आलीय...नेमकं काय घडलंय....पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुंबई महापालिकेचे महापौर आणि आयुक्त उठा, झोपेतून जागे व्हा... आणि ही परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहा... झोळीत डिलिव्हरी झालेल्या या मुलीला घेऊन जातानाचा हा व्हिडिओ ना कोणत्या आदिवासी भागातला ना कोणत्याही ग्रामीण भागातला....ही अवस्था आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली...

कुर्ल्यात राहणाऱ्या अंजली पवार या महिलेला रात्री पोटात दुखू लाखल्यानं तिच्या आईनं घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयातील नर्सना घरी येऊन प्रसुती करण्याची विनंती केली...मात्र मदत सोडा तिथल्या नर्सनी आता आम्हाला इतकच काम राहिले आहे का की झोपडपट्टी वाल्यांची प्रसूती करायची? असं म्हणत कुटुंबीयांशी वाद घातल्याचा आरोप करण्यात आलाय...

दरम्यान प्रसूतीच्या वेदनेनं अंजली जमिनीवर पडलेली असतानाच वैद्यकीय मदतीसाठी तिचे आई-वडील धावपळ करत होते...मात्र पालिकेतील हॉस्पिटलमधील नर्सेसच्या हातापाया पडल्यानंतर त्यांनी व्हीलचेअर देण्याची तयारी दाखवली...मात्र डिलिव्हरी झालेल्या अंजलीला नाळ सकट व्हीलचेअर वर बसवायचं कसं असा निर्माण झाल्यावर अखेर शेजारीच राहणाऱ्या मयंक सोलंकी या तरुणानं मित्रांसह झोळीत घालून अंजलीला हॉस्पिटलला नेलं...मात्र हॉस्पिटलच्या दारातही कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसले..

दुसरीकडे मयंक आणि अंजलीच्या कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर आरोप केल्यानंतर मदत करण्याऐवजी मयंकवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली.. त्यावेळी मयंक आणि अंजलीचे कुटुंबीय थेट पोलिस स्टेशनला पोहचले...तेव्हा पोलिसांनीही पीडित कुटुंबाची बाजू जाणून घेण्याऐवजी काय सांगितलं ऐका...

दरम्यान संबंधित महिलेची रुग्णालयात योग्य काळजी घेतली जात असून आम्ही त्यांना व्हीलचेअर ऑफर केली होती, असा अजब दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय... तर दुसरीकडे रुग्णालयातील नर्सेसनी त्या ठिकाणी जाऊन प्रसूती करायला हवी होती असं विधान आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदीर्गे यांनी केलयं...तसचं याप्रकरणाचा अहवालही त्यांनी मागवलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

11 लाखांचे 15 कोटी करणारा नवा खरात, श्रीमंतीची हौस, भोंदूनं पाडला पैशांचा पाऊस?

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, 550 अधिकाऱ्यांची मूळ विभागात रवानगी

SCROLL FOR NEXT