KHERWADI POLICE BUST AUTO-RICKSHAW THEFT GANG, RECOVER 12 STOLEN VEHICLES WORTH ₹8.5 LAKH Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; असे फसले जाळ्यात

Mumbai Crime News : खेरवाडी पोलिसांनी ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली. आरोपींकडून सुमारे 8.50 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • खेरवाडी पोलिसांनी ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  • दोन सराईत आरोपींना अटक

  • 12 चोरीच्या ऑटोरिक्षा जप्त

  • सुमारे ₹8.50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या 12 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणांवरून ऑटोरिक्षा चोरीच्या घटना घडत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर 15 जून 2026 रोजी बांद्रा पूर्व येथील कार्डिनल स्कूलसमोरील रस्त्यालगत उभी असलेली MH-02-EF-3211 क्रमांकाची ऑटोरिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 327/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये मो. इक्बाल सिरताजअली शेख उर्फ लकी (वय 23) आणि मो. फरीद मिराजअली हाशमी (वय 20) हे दोघे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. त्यानंतर गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींवर पाळत ठेवण्यात आली.

तपासादरम्यान आरोपी चोरीच्या ऑटोरिक्षांचा वापर करून विविध बांधकाम साईटवरील भंगार चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच काम झाल्यानंतर चोरीच्या रिक्षा निर्जनस्थळी लपवून ठेवत असल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वाकोला पाइपलाइन परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ऑटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून एकूण 12 ऑटोरिक्षा जप्त केल्या.

तपासात खेरवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक 301/2026, 320/2026, 325/2026, 327/2026, 330/2026, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक 515/2026, 521/2026, 526/2026, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक 643/2026 तसेच वाकोला पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक 706/2026 उघडकीस आले आहेत. आरोपींपैकी मो. इक्बाल शेख उर्फ लकी याच्यावर यापूर्वीही खेरवाडी पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अभिनव देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (पश्चिम परिमंडळ-1) निमित गोयल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (खेरवाडी विभाग) संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुणाल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार तातोबा मोरे, गणेश सावंत, गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे तसेच पोलीस शिपाई समीर कांबळे आणि महेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

Kidney Cancer: या 6 व्यक्तींना असतो किडनीच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

School Timing : पुढील १५ दिवस राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? पालक-शिक्षकांनी का केली मागणी

SCROLL FOR NEXT