Mumbai : चेंबूर मध्ये जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित होणार SaamTvNews
मुंबई/पुणे

Mumbai : चेंबूर मध्ये जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित होणार

दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडर पुरवठ्याची क्षमता

जयश्री मोरे

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी आणि नव्या विषाणूचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 'मिशन ऑक्सिजन'ची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांट च्या उभारणीला तीन महिन्यांपूर्वी सुरुवात केली असून लवकरच हा प्लांट सुरू केला जाणार आहे.

हे देखील पहा :

महानगरपालिकेच्या निर्देशानुसार या प्लांट मधून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. याप्रमाणेच खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरसीएफ कंपनीने गोवांडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे. नव्या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप देशात सापडला नसला तरीही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोविड टास्क फोर्स ने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्वतोपरी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा जंबो ऑक्सिजन प्लांट भविष्यात मुंबईत वैद्यकीय ऑक्सिजन ची कमतरता भासू देणार नाही, याचा विश्वास असल्याचे खासदार शेवाळे म्हणाले.

आज महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. पूर्ण महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. कोविडच्या संकटात महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठीण परिस्थितीत जे निर्णय घेतलेत आणि कोविडची परिस्थिती हाताळली याची दखल सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि डब्ल्यूएचओ ने देखील घेतली आहे. मुंबई तसेच देशातून सर्वेनुसार मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लोकांचा कौल आहे. दोन वर्षात कोविड च्या काळात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाचवलं आणि याची दखल पुढच्या भविष्यकाळात जनता घेईल असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

SCROLL FOR NEXT