अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलेला तो क्षण अखेर जवळ आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होत आहे. निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. काही तासांनी मतदानास सुरुवात होईल. त्याआधी मंगळवारी रिपब्लिकनचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेरची जाहीर प्रचारसभा घेतली. या रॅलीत ते जोरदार नाचले. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय असे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याशी त्यांनी स्वतःची तुलना केली.
डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी मिशिगनमध्ये अखेरची प्रचार रॅली झाली. जवळपास दोन तास ते व्यासपीठावरून मतदारांशी संवाद साधत होते. अविरत ते बोलत होते. शेवटी ते व्यासपीठावरून खाली उतरले. सभेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये गेले. तेथे त्यांच्याशी संवाद साधला. लोकांशी त्यांनी हस्तांदोलन केले. त्यांचे अभिवादनही स्वीकारले. तेथील फेमस पॉप साँग वायएमसीएवर ते मनसोक्त नाचले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यासपीठावरून संबोधित करताना अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती राहिलेले अब्राहम लिंकन यांच्याशी स्वतःची तुलना केली. आपणही त्यांच्यासारखेच असल्याचे ट्रम्प म्हणाले.
यापूर्वीही त्यांनी अनेकदा लिंकन यांच्याशी स्वतःची तुलना केली आहे. याचवेळी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची खिल्लीही उडवली होती. समजा, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग युद्ध किंवा तैवानसंबंधित अमेरिकेशी चर्चा करू इच्छित आहेत, तर ते कुणाला फोन करतील? अशावेळी ते कदाचित माझ्याशी फोनवरून संपर्क साधतील, असे सांगतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टोलेबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.