मुंबईत नोकरी करायची आहे, माज जर तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला या नोकरीसाठी अर्जही करता येणार नाही! होय, धक्कादायक वाटत असले तरी हे सत्य आहे. 'नोकरी डॉट कॉम' आणि 'लिंक्डइन' या नामांकित जॉब पोर्टल्सवर प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने सध्या महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेला पुन्हा एकदा डिवचलयं...मुंबईतल्या नोकऱ्यांवरून पुन्हा एकदा भाषिक वादाचा भडका उडालाय...मराठीद्वेष करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीत नेमकं काय लिहलयं...पाहा
सिनियर मॅनेजर आणि AGM अकाउंट्स-फायनान्स या पदासाठी वार्षिक 25 ते 35 लाख रुपयाचं वेतन देण्यात येईल...तसचं नोकरी मुंबई असून फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारच अर्ज करू शकतात, अशी अट आहे..मुंबईत नोकरी, वेतन तब्बल 25 लाख... पण पात्रता काय, तर गुजराती-मारवाडी असणंच बंधनकारक...अहमदाबाद येथील एका रिक्रुटमेंट एजन्सीनं ही जाहिरात पोस्ट केल्याचं समोर आलयं....मात्र नोकरी मुंबईत असताना मराठी उमेदवारांना सरळ सरळ डावलण्यात आल्यामुळे, 'मुंबईकर मराठी तरुणांनी जायचं कुठे?' असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. रोजगार प्रक्रियेतील या उघड भाषिक भेदभावामुळे संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली जातेय...मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं याप्रकरणात कंपनीला थेट इशाराच दिलाय...
मराठीद्वेष करणाऱ्या अहमदबादमधील रिक्रूटमेंट कंपनीनं बिझनेस कम्युनिटीशी संवाद साधण्यासाठी त्या भाषेचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची गरज असल्यानं अशी जाहीर दिल्याचं स्पष्टीकरण दिलयं....मात्र एजन्सीने जरी मराठीद्वेषावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, महाराष्ट्रातचं मराठी तरुणांना डावल्याचा हा खोडसाळपणा या मराठीद्वेष्टया कंपन्या का करतात...उद्योग, नोकरी आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रात मराठी भाषकांनी आपली मजल मारलेली असताना भाषेच्या ज्ञानाच्या नावाखाली सुरु असणारा मराठीद्वेष अन्यायकारक आहे. महाराष्ट्रात कंपन्या चालवून मराठीचा द्वेष करणाऱ्या या कंपन्यांच्या मुसक्या आवळायला हव्या... अन्यथा हे मराठीद्वेषी डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला कमी करणार नाहीत....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.