Mumbai Is A Expensive City In India Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबई हे सर्वाधिक महाग शहर; पुण्यासह देशातील इतर प्रमुख शहरे कितव्या स्थानी? वाचा यादी

Mumbai Is A Expensive City In India: मुंबई हे सर्वात महागडे शहर असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. परदेशी लोकांना मुंबईत राहणे सर्वाधिक महाग होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्नांचे शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते. मुंबईत रोज अनेक लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. गाव-खेड्यातून, परदेशातून मुंबईत लोक पोटाची खळगी भरायला येतात. तर अनेकजण शिकण्यासाठी येतात. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखले जाते. हेच शहर परदेशी नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वाधिक महाग शहर असल्याचे समोर आले आहे.

मर्सरच्या २०१४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्वेक्षणानुसार, वैयक्तिक सुविधा, गरजा, वाहतूक, घरभाडे, जेवणाचा खर्च याबाबतीत मुंबई महाग आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत या सर्व गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. तर जागतिक पातळीवर हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर आहे.

सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई १३६ क्रमाकांवर आहे. मागच्या वर्षी मुंबई १४७ क्रमांकावर होती. तर दिल्ली १६४ क्रमांकावर आहे. चेन्नई १८९ स्थानावर तर बंगळुरु १९५ क्रमांकावर आहे. हैदराबाद २०२ क्रमांकावर तर पुणे २०५ क्रमाकांवर आहे. मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर आहे.

'मुंबई जरी रँकिंगमध्ये महाग शहर असले तरीही मुंबईत राहणे परवडणारे आहे. देशांतर्गत असलेली वस्तूंची मागणी तसेच सेवा या क्षेत्रामुळे भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे, जागतिक गृहनिर्माण खर्च आणि महागाई वाढल्याने राहणीमान सुधारणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई एक आकर्षक ठिकाण बनत आहे. त्यामुळेच कदाचित मुंबईत राहणे थोडे महागले असावे', असे राहुल शर्मा, इंडियन मोबिलिटी लीटर मर्सर यांनी सांगितले आहे. दिल्लीतील घरभाड्यात वाढ झाली आहे. तसेच प्रवासी संख्येतदेखील १२-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत एकूण ६-८ टक्के लोकांमध्ये वाढ झाली असून पुणे, हैदराबाद, चेन्नईमध्ये २-४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अहवालात सांगितले आहे.

ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्ससह वाहतूक खर्चातदेखील मुंबई सर्वात महाग आहे. यानंतर ऑटोमोबईल पार्ट विक्रीमध्ये बंगळुरुचा दुसरा क्रमांक लागतो. कोलकत्ता शहरात दुधाचे पदार्थ, ब्रेड उत्पादन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी खिशाला परवडणाऱ्या किंमती आहेत.

मुंबई सर्वच गोष्टींमध्ये महागली आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू, सेल्फ केअर म्हणजे वैयक्तिक काळजीसाठी लागणाऱ्या गोष्टींच्या किंमती जास्त आहेत. तर मुंबईत उर्जा आणि उपयोगी गोष्टी खरेदी करण्यासाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT