IAS Officer Sanjeev Hans Bribery Case Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Sanjiv Hans Bribe : IAS संजीव हंस अडचणीत; बिल्डरकडून १ कोटींची लाच घेतल्याचा आरोप, काय आहे संपूर्ण प्रकरण?

IAS Sanjiv Hans Bribe News : मुंबईतील नामांकित बिल्डर्सकडून १ कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • आयएएस संजीव हंस यांच्यावर १ कोटी लाच प्रकरणात गुन्हा

  • बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत

  • सीबीआयकडून तपासाची जबाबदारी निश्चित

  • प्रकरणात अनेक आरोपींचा समावेश

IAS Officer Sanjeev Hans Bribery Case वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस यांनी परवानगी मिळवून देण्याच्या बदल्यात मुंबईतील नामंकित बिल्डर्सच्या प्रवर्तकांकडून लाच मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता त्यांच्यावर काय कारवाई ? केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस हे भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांचे तत्कालीन खाजगी सचिव आहेत. संजीव हंस यांनी RNA कॉर्पोरेशनचे कर्मचारी विपुल बन्सल आणि इतरांना हाताशी घेऊन, राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडून (NCDRC) अनुकूल आदेश मिळवून देण्याच्या बदल्यात मुंबई मधील नामांकित बिल्डर्सच्या प्रवर्तकांकडून लाच स्वीकारली.

विपुल बन्सल यांनी संजीव हंस आणि आरएनए ग्रुपचे प्रवर्तक अनुभव अग्रवाल यांची भेट घडवून आणली. संजीव हंस यांनी बिल्डर्सच्या बाजूने एनसीडीआरसीमध्ये दोन वेगवेगळ्या तारखा मिळवल्या आणि कंपनीचे संचालक अग्रवाल यांची अटक टाळली. या बदल्यात, अग्रवाल यांनी विपुल बन्सल यांच्यामार्फत संजीव हंस यांना ठरल्याप्रमाणे १ कोटी दिले.

याप्रकरणी संजीव हंस, विपुल बन्सल, अनुभव अग्रवाल, पुष्पराज बजाज, शादाब खान, देवेंद्र सिंग आनंद, मुकुल बन्सल, बिल्डर्स आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. या तपासाची जबाबदारी सीबीआय निरीक्षक अमन राणा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tueday Horoscope: आज तुमचे जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

SCROLL FOR NEXT