मुंबई/पुणे

Mumbai Hospital: रुग्णालयाचा निष्काळजीपणा; कुटुंबीयांकडे पाठवला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह, स्मशानभूमीत सत्य आलं समोर

Mumbai News : मुंबईतील एका रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. एका कुटुंबीयांला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह पाठवला. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते तेव्हा या गोष्टीचं सत्य समोर आलंय.

Bharat Jadhav

Mumbai Hospital :

मुंबईतील एका रुग्णालयाचा निष्काळजीपणामुळे कुटुंबियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. रुग्णालयाने या कुटुंबियाच्या नातेवाईकाच्या मृतदेहाऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्याचा प्रकार समोर आलाय. स्मशानभूमीत गेल्यानंतर या मृतदेहाविषयीचं सत्य समोर आलंय. मृत व्यक्तीचं नाव कृष्णत महादेव पाटील होतं.(Latest News)

ही व्यक्ती वरांगे पाडळी गावातील रहिवाशी होती. मृत कृष्णतला सुरुवातीला रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान येथे खाटा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचा तेथेच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी नेण्यापूर्वी दोन दिवस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पाटील यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले होते तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवला होता.

मृत व्यक्तीचे मेहुणे जयसिंग मुसळे म्हणाले, "आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि गुरुवारी दुपारी मृतदेह आमच्या गावी आणला." मृतदेह थेट स्मशान स्थळी नेण्यात आला. मात्र अंत्यसंस्कारस्थळी चेहरा पाहिल्यानंतरच मृतदेह पाटील यांचा नसून अन्य कोणाचा असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. चुकीच्या व्यक्तीचा मृतदेह पाहुन मृत पाटील यांचा भाऊ योगेशला मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, पाटील यांच्या कुंटुबीयांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला सविस्तर माहिती दिली. रुग्णालयाने चुकीचा मृतदेह पाठवल्याचं सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने पाटील यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे पाठवला. या घटनेवर धर्मादाय-न्यास संचालित रुग्णालयाने प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

Kokum Curry Recipe : गरमागरम भात अन् आंबट-गोड कोकम कढी, श्रावणात बनवा खास बेत

Maharashtra Politics : बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

Ravikant Tupkar: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची राख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवणार|VIDEO

Highest Paid Indian Actors: 'पुष्पराज'समोर खानची जादू फेल; 'हे' आहेत सर्वाधिक मानधन घेणारे १० कलाकार

SCROLL FOR NEXT