Ram Kadam Criticized Udhhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Hoarding Collapse : कुठे फेडणार हे पाप? भावेश भिंडे-उद्धव ठाकरेंचा फोटो X पोस्ट करत भाजपचा सवाल

Ram Kadam Criticized Udhhav Thackeray: घाटकोपर होर्डिंग अपघातावरून राजकारण सुरू असल्याचं दिसत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी एक फोटो X वर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rohini Gudaghe

घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. ही घटना १३ मे रोजी दुपारी घडली आहे. या घटनेवरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा युद्ध सुरू झालं आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभेचे भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या X अकाउंटवर भिडेंसोबतचा फोटो पोस्ट करत करत उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे. भावेश भिंडे हा त्या पेट्रोलपंपावर लावलेल्या होर्डिंगचा मालक आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय.

राम कदम यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय?

राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांच्या भेटीचा तो फोटो असल्याचं दिसत आहे. राम कदम यांनी हा उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि भावेश भिंडे यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, १४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार असणारा हाच तो भावेश भिडे आहे. तो श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात असल्याचा त्यांनी अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. मनाला चीड आणणारं चित्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचं होतं? असा सवाल राम कदम यांनी त्यांच्या पोस्टमधून केला आहे. हे या (पोस्टमधील) चित्रावरून स्पष्ट होतं, असंही कदम म्हणाले आहेत. टक्केवारीसाठी कोरोना काळातील खिचडी चोर, कफनचोर अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. आज टक्केवारीसाठी निष्पाप १४ लोकांचे बळी (Bhavesh Bhinde) घेतल्याची टीका त्यांनी केली आहे. हे पाप कुठे फेडणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

घाटकोपर होर्डिंग अपघाताप्रकरणी आता राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. या दुर्घटनेमध्ये ७४ लोकं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेसह राजकीय नेत्यांची मोठी रीघ लागली होती. आता भाजप आमदाराने या घटनेवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Dry fruits Ladoo: लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू; सोपी रेसिपी वाचा

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

SCROLL FOR NEXT