गोरेगावमध्ये हिट-अँड-रन अपघात
७६ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी
आरोपी स्कूटरस्वार फरार
पोलिसांकडून तपास आणि शोध मोहीम सुरू
Mumbai Goregaon Hit And Run Accident News मुंबईतील गोरेगाव परिसरात भीषण अपघात झाला आहे. गोरेगाव पश्चिम येथील एम.जी. रोडवर ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाबूलाल चोप्रा यांना भरधाव वेगात येणाऱ्या एका स्कूटरस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत बाबूलाल चोप्रा गंभीर जखमी झाले असून ते सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जगण्यासाठी झुंज देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ :४० वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव वेगात येणाऱ्या एका स्कूटरस्वाराने बाबूलाल चोप्रा यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
अपघातानंतर आरोपी स्कूटरस्वाराने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेमुळे कुटुंबीय आणि जैन समाजात संताप व्यक्त केला जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना २२ मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोरेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हिट-अँड-रन करणाऱ्या स्कूटरस्वाराचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.