Kishori Pednekar Saam Tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar News: किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा; कथित SRA घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने दिले 'हे' निर्देश

SRA Scam: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कथित एसआरए घोटाळ्या प्रकरणी पुढील निर्देशापर्यंत आरोप पत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहे. ३० मार्चपर्यंत मु्ंबई उच्च न्यायालयातील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pendekar) आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात 'एसआरए' प्रकरणी मुंबईत एफआयआर दाखल झाला होता. वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. पेडणेकर यांच्यावर फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

मुंबईच्या वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर ,कुटुंबातील सदस्यासहित किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

किशोरी पेडणेकर यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. कथित एसआरए घोटाळ्या प्रकरणी पुढील निर्देशापर्यंत आरोप पत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 30 मार्चपर्यंत हायकोर्टातील सुनावणी तहकूब केली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्याआधी किशोरी पेडणेकर (Kishori Pendekar) यांची 'एसआरए'योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाई झाली होती. त्याचबरोबर पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले होते. त्याच प्रकरणात पेडणकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला होता.

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर काय आरोप केले होते?

सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर आरोप करताना म्हणाले, 'किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य फसवणुकीत सहभागी आहेत. किशोरी पेडणेकर,त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ,किश किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि अन्य चार जणांच्या विरोधात २०१२ मध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी समन्स जारी करण्यात आले होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT