Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News: रोहित पवार यांना मोठा दिलासा; हायकोर्टाचे ६ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने मोठा दिलासा आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Rohit Pawar News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने मोठा दिलासा आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला ६ ऑक्टोबरपर्यंत रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्यचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे. (Latest Marathi News)

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला काल मध्यरात्री २ वाजता नोटीस पाठविण्यात आली होती. बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवारांना 72 तासांचा वेळ दिला होता.

आज मुंबई हायकोर्टाकडून रोहित पवार यांना बारामती अॅग्रोबाबत दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. तर बारामती ॲग्रोबाबत सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांच्या कंपनीला मध्यरात्री २ वाजता नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रोहित पवार यांनी काल याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

रोहित पवार ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले होते?

रोहित पवार म्हणाले होते की, 'राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

'संघर्ष करताना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

'आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT