Nitin Gadkari News: पोस्टर नाही, बॅनर नाही... यंदा निवडणुकीचा प्रचार कसा करणार? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये आगामी लोकसभेवर मोठं भाष्य केलं.
Nitin Gadkari
Nitin Gadkari saam tv
Published On

मनोज जयस्वाल

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. वाशिमच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका वक्तव्याने चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये आगामी लोकसभेवर मोठं भाष्य केलं. तसेच आगामी निवडणुकीत प्रचार कसा करणार, त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वारंगा ते अकोला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 च्या 3695 कोटी रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Nitin Gadkari
Raj Thackeray Tweet : '... तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे आक्रमक

नितीन गडकरी म्हणाले, मी खोटं आश्वासन देत नाही, मी खोटं बोलत नाही, जे काही तोंडावर सांगतो. ४३ वर्षाच्या आयुष्यात मी जे काही बोललो, ते मी केले आहे. याबद्दल कोणीही पत्रकार मला म्हणू शकत नाही की, तुम्ही असे बोलले होते, ते तुम्ही केले नाही'.

पुढे म्हणाले की, येत्या लोकसभेत तर मी ठरवलं आहे की पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही , चहा पाणी करणार नाही. ज्यांना मत द्यायचे आहे, त्यांनी द्या. नसेल तर नका देऊ, असे म्हणत राजकारणात खोटे बोलण्याची काही गरज नाही, असे त्यांनी सांगीतले.

'प्रमाणिकपणे लोकांची सेवा करेल, मी पैसा खाणार नाही आणि तुम्हाला खाऊ देणार नाही. तुमची सेवा मात्र प्रामाणिकपणे करेल,असे म्हणाले. गरीब-गरीब असतो, त्याला जात, पंथ , धर्म, भाषा नसते. या देशातील गरीबी, भूकमारी, बेरोजगारी दूर केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Nitin Gadkari
Sambhajinagar News: बैलगाडा शर्यतीत दोन गट भिडले; दगडफेकीत दोन चिमुकले गंभीर

दरम्यान, आज वाशिम येथे नितीन गडकरी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी जुन्या राष्ट्रीय रस्त्याची दयनीय अवस्था पाहिली. त्यानंतर त्यांनी वाशिमचा जुना राष्ट्रीय रस्ता सिमेंट कॉक्रेटचा करून देतो असे आश्वासन दिले. परंतु याकरीता या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com