Mumbai Rains Today Saam TV
मुंबई/पुणे

Thane Rain VIDEO : ठाण्यात तुफान पाऊस, रस्त्यावर २ फूट पाणी; मुंबईसह उपनगरांतही बरसला!

Heavy Rains in Mumbai : ठाण्यातील वंदना सिनेमा या ठीकाणी पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

Ruchika Jadhav

मुंबईसह उपनगरांत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलं आहे. पाण्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सकाळपासून मुंबईत पाऊस बरसत असल्याने सखल रहिवासी परिसरात थेट घरातही पाणी शिरलं आहे.

ठाण्यातील वंदना सिनेमा या ठीकाणी पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याच्या बाजूला असणार्‍या चेंबरमध्ये नागरिक पडण्याची भीती वर्तवली जातेय. वंदना सिनेमा परिसरात दोन फुटाहून अधिक पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन धारकांना गाड्या चालवण्यासाठी त्रास होत आहे.

मुंबईस ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा आणि बदलापूर अशा सर्वच शहरांत पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पावसाने बळीराजा सुखावला

मुंबईसह यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी नांदेडमध्ये मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता. पण पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते.

दरम्यान आज सकाळ पासूनच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलीय.जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर पडतोय.या पावसामुळे खरिपाच्या पेरण्याला वेग येणार असून या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर आज पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय. मागील तसाभरापासून पालघर, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT