MUMBAI HARBOUR LINE EXTENSION TO BORIVALI: WESTERN RAILWAY INVITES TENDERS FOR ₹898 CRORE PROJECT Saam Tv
मुंबई/पुणे

Harbour Local : हार्बर मार्गाचा मोठा विस्तार! गोरेगावच्या पुढेही धावणार पनवेल लोकल; प्रवाशांना दिलासा

Harbour Line Extension : मुंबईतील हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली दरम्यान विस्तार होणार आहे. पश्चिम रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना थेट हार्बर लोकलची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Alisha Khedekar

  • हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली विस्तार होणार

  • हा प्रकल्प MUTP 3A अंतर्गत राबवला जाणार आहे

  • या प्रकल्पासाठी ८९८.२९ कोटी रुपयांचा खर्च

  • प्रकल्पांतर्गत २ मोठे आणि १६ लहान पूल उभारण्यात येणार

Harbour Line Extension Western Railway Line प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता तुम्हाला हार्बर मार्गावरून फक्त गोरेगाव पर्यंतच नाहीतर बोरिवली पर्यंतचा देखील प्रवास करता येणार आहे. रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते बोरिवली दरम्यानच्या विस्तारासाठी निविदा मागवल्या आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP 3A ) अंतर्गत राबवण्यात येत आहे.

सध्या हार्बर मार्ग गोरेगाव स्थानकापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरातील प्रवाशांना हार्बर मार्गाचा थेट लाभ मिळत नाही. या भागातील प्रवाशांना सीएसएमटी, कुर्ला (Kurla), वडाळा (Wadala), पनवेल किंवा नवी मुंबईकडे जाण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्ग (Goregaon To Borivali Harbour Line Extension) विस्तार पूर्ण झाल्यानंतर बोरिवली परिसरातील प्रवाशांना थेट हार्बर लोकलची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे सीएसएमटी, कुर्ला, वाशी, बेलापूर, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच पश्चिम रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे.

मात्र, या विस्तारामुळे जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या स्थानकांवर काही प्रमाणात गर्दी वाढू शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ८९८.२९ कोटी रुपये आहे.

प्रकल्पांतर्गत दोन मोठे आणि १६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी चार अभियांत्रिकी आराखडे तयार करण्यात आले असून ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पुलांना आवश्यक मंजुरी मिळाली असून उर्वरित आराखड्यांवर काम सुरू आहे. हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील लाखो प्रवाशांना अधिक जलद, सोयीस्कर आणि थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT