Mumbai-Goa National Highway Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गबाबत सरकारचं मोठं पाऊल, गणेशोत्सवापुर्वीच...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरस्तीचे कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरणं आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत.

ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या. (Public Works Minister Ravindra Chavan)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa National Highway) दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) खासदार सर्वश्री सुनील तटकरे, विनायक राऊत आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे,

पाहा व्हिडीओ -

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT