मुंबई : सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारला घेरत आहे. विधासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुद्धा पाहायला मिळत आहे. आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत भाषण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे, कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. (Maharashtra assembly Monsoon Session News Updates)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विरोधकांनी नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. एकीकडे विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे सरकारच्या विविध कामांवर प्रश्नचिन्ह उभे करताहेत तर दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषण करताना मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
'मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे, कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय', असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 'एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी नगरविकास खातं होतं आणि आता सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्याकडे तेच खातं आहे. त्यांच्या सद्विवेक बुद्धिला आपण विचारलं तर सुरुवातीला त्यांनी अप्रत्यक्ष निवडणुकीचा निर्णय घेतला. आता पुन्हा हा निर्णय थेट निवडणुकीचा होतोय. यातून एक संदेश जातोय की मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे. मंत्रिमंडळात कुणीतरी बॅक सीटवरून ड्रायव्हिंग करतंय', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Maharashtra Assembly Session Today)
अजित पवारांनी भाजप आमदारांना झापलं
विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच गाजला. सभागृहात बोलताना अडथळा निर्माण करणाऱ्या भाजप आमदारांना अजित पवारांनी चांगलेच सुनावले. 'तुम्हालाच सगळं कळतं का ? आम्ही येथे काय गोट्या खेळायला आलो आहोत का ? अशा शब्दात भर सभागृहात भाजप नेत्यांना अजित पवारांनी चांगलेच सुनावले.
अजित पवार हे सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिले. अजित पवार म्हणाले, 'तुम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. भाजपचे किंवा शिंदे गटाचे नाहीत. ठरवलं तर तुम्ही काही करू शकता हे वर्षभरात कळलं. या देशातल्या एका भाजपच्या नेत्याने जाहीर केलं की, आम्ही महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून काढला. गिरीश महाजन तुम्ही जवळचे आहात. ग्राम विकासवर कसं तरी निभावले, नाही तर झटका फार मोठा होता'. अशी टोलेबाजी पवारांनी केली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.