सचिन कमद
Raigad Accident News: रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात बसमधील १० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Accident News)
रायगडच्या माणगाव तालुक्यातील धरणाची वाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. खाजगी बस मुंबईच्या दिशेने जाताना समोरून येणाऱ्या ट्रकवरती धडकली. ही धडक इतकी मोठी होती की,यात ट्रक आणि बस दोन्हीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना सातत्याने अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अपघाताच्या या घटना टाळण्यासाठी पुणे आरटीओकडून आता अधिक खबरदारी घेतली जात आहे. पुणे आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर पुणे आरटीओ सतर्क झाले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओची करडी नजर आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी होणार आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर पुणे आरटीओ सतर्क झाले आहे.
सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी होणार आहे. पुणे आरटीओकडून वायुवेग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातून विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.