Overturned container blocks Mumbai-Goa highway near Cholai village, causing one-way traffic. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर चोलाई गावाजवळ एका कंटेनरचा अपघात झालाय. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने रस्ता पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • मुंबई-गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी.

  • अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यात आडवा झाल्यानं वाहतुकीला अडथळा.

  • वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू.

  • वाहनचालकांना महामार्गावर कोंडी व विलंबाचा सामना.

सचिन कदम , साम प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई गावाजवळ कंटेनर उलटून अपघात झालाय.

अपघातग्रस्त कंटेनर रस्तात आडवा पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून एकेरी वाहतुक सुरू आहे. अपघातामध्येमुळे कशेडी घाट आणि पोलादपुर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरूय. माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत आहे.

रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अशी पूरस्थिती निर्माण झाली होती .

रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालंय. जोरदार पावसाचा म्हसळा तालुक्याला फटका बसलाय. म्हसळा बाजारपेठेत पावसाचे पाणी साचले आहे. म्हसळ्यातील ढोरजे पुल पाण्याखाली गेलाय. म्हसळा तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटलाय. जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे.

काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. आता हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रस्त्यावर, सखल भागात पाणी साचले असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरूय. काही भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवलीय. मुंबई महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलाय. त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झाला आहे. पूर्व-पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही कोकण ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT