MUMBAI SEX RACKET BUST: TWO ACTRESSES RESCUED, CELEBRITY MAKEUP ARTIST DETAINED IN GIRGAON RAID Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी धाड टाकत २ प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघांना घेतलं ताब्यात

Mumbai Crime News : मुंबईतील गिरगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या धाडीत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • गिरगाव परिसरात पोलिसांनी देहव्यापार रॅकेटवर धाड टाकली

  • कारवाईदरम्यान दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली

  • सेलिब्रिटींसोबत काम करणारा एक मेकअप आर्टिस्ट पोलिसांच्या ताब्यात

  • या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे येथून वेश्याव्यसाय प्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलं होत. यानंतर मुंबईतील उच्चशिक्षित मानल्या जाणाऱ्या गिरगावातून वेश्याव्यवसायाशी संबंधित मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या एका मेकअप आर्टिस्टलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एका ठिकाणी महिलांना देहव्यापारासाठी भाग पाडले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आणि एक बनावट ग्राहक घटनास्थळी पाठवला. प्राथमिक पडताळणीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.

या धाडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी एक महिला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारवाईदरम्यान मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रिटींसोबत काम करणारा एक मेकअप आर्टिस्टही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या रॅकेटमध्ये त्याची नेमकी काय भूमिका होती, याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित आरोपींकडून चौकशी सुरू असून या रॅकेटचे जाळे किती व्यापक आहे, याचा शोध घेतला जात आहे. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई विरार शहरात पावसाची मध्यरात्रीपासूनच जोरदार बॅटिंग

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये नवा ट्विस्ट! सत्य समोर आणण्यासाठी सायलीचा जीवघेणा प्लॅन

PF Withdrawal Rule: EPFO 3.0 मुळे पीएफ काढणं सोपं झालं , पण रिटायरमेंटआधी सतत पैसे काढल्याने होईल नुकसान; वाचा सविस्तर...

Cancer tumor growth: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना ही ५ मोठी लक्षणं पायांमध्ये दिसतात

ग्लोईंग स्किनच्या नादाच चेहऱ्याची लागेल वाट, कोरियन स्किनकेअर करणाऱ्यांनी 'हे' आधी वाचा

SCROLL FOR NEXT