file photo  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत भीषण अपघात! घाटकोपरमध्ये ओला चालकाने ८ जणांना उडवलं

मुंबईच्या घाटकोपरमधून भीषण अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये ओला चालकाने आठ जणांना उडवलं आहे.

जयश्री मोरे

Mumbai Accident News : मुंबईच्या घाटकोपरमधून भीषण अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये ओला चालकाने आठ जणांना उडवलं आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपरच्या (Ghatkopar) सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात नेमका कसा घडला ?

मुंबईच्या घाटकोपरमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. ओला चालकाने आठ जणांना उडवलं आहे. या अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू यादव असं या ओला चाकलाचे नाव आहे.

आज दुपारी एक वाजता ओला चालकाच्या गाडीने अचानक वेग घेतला. त्या चालकाने थेट रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. या चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना ओला चालकाने धडक दिली. सदर अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. यात तीन विद्यार्थ्यांचाही सामावेश आहे.

सदर अपघातानंतर पोलिसांनी अपघातानंतर ओला चालक राजू यादवला अटक केली आहे. तर जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर पोलीस देखील राजावाडी रुग्णावाडीत पोहोचले आहेत. त्यांच्याकडून जखमींची विचारपूस सुरू आहे.

पोलीसाचं पथक अपघात झालेल्या घटनास्थळी देखील झाले आहे. चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीमध्ये बिघाड झाला होता अथवा सदर ओला चालक नशेत होता या संदर्भातील माहिती घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांकडून चालकाची चौकशी सुरू आहेत. सदर अपघातातील जखमीची संख्या वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad Tourism : महाडजवळ कुठे फिराल? पिकनिकसाठी ‘ही’ ५ ठिकाणं ठरतील बेस्ट

Ganesh Visarjan: गणपती चालले गावाला...; मुंबई- पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

Maharashtra News Live Update: जुहू समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी, सुलभ शौचालय चालकाकडून भाविकांची लूट

Rain Alert : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, 'या' १२ राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

SCROLL FOR NEXT