Ganpati Visarjan Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpati Visarjan: मुंबईकरांची कृत्रिम तलावांनाच पसंती, ७२ हजार २४० घरगुती मूर्तींचे विसर्जन

Ganpati Visarjan 2023: मुंबईकरांची कृत्रिम तलावांनाच पसंती, ७२ हजार २४० घरगुती मूर्तींचे विसर्जन

Satish Kengar

Ganpati Visarjan 2023:

मुंबईतील गणेशोत्सवात यंदा दहा दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण २ लाख ५ हजार ७२२ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. पैकी, ७६ हजार ७०९ मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्यात. यामध्ये घरगुती ७२ हजार २४० गणेशमूर्ती समाविष्ट आहेत. कृत्रिम विसर्जन स्थळावर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ यंदा वाढला आहे. एवढेच नव्हे तर, नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळ मिळून एकूण ५०० मेट्रिक टन निर्माल्य संकलन देखील करण्यात आले आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दहा दिवसांच्या कालावधीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली होती. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला चालना देण्याच्या दृष्टीने यंदा मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०० कृत्रिम विसर्जनस्थळांवर देखील मूर्ती विसर्जन व्यवस्था केलेली होती.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात सार्वजनिक, घरगुती, हरतालिका आणि गौरी या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांच्या ठिकाणी करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा कृत्रिम तलावांना पसंती दिली. एकूण १ हजार ९०४ गणेशोत्सव मंडळांनी कृत्रिम तलावांत मूर्तीचे विसर्जन केले. घरगुती मूर्तींमध्ये यंदा सर्वाधिक अशा ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाले. तर २ हजार ५६५ हरतालिका आणि गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावांच्या ठिकाणी करण्यात आले, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

दहा दिवसांची घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची कृत्रिम तलावांच्या ठिकाणची आकडेवारी

दीड दिवस- २७ हजार ५६४

पाच दिवस- २९ हजार ७९२

सात दिवस- ४ हजार ६७७

दहा दिवस- १० हजार २०७

एकूण– ७६ हजार ७०९

दहाव्या दिवशी नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन झालेल्या एकूण मूर्ती

सार्वजनिक- ६ हजार ९५१

घरगुती- ३२ हजार ३४५

गौरी- ४६१

एकूण- ३९ हजार ७५८

दहाव्या दिवशी कृत्रिम तलावांत विसर्जन झालेल्या मूर्ती

सार्वजनिक- ७४०

घरगुती- १० हजार २०७

गौरी- १६०

एकूण- ११ हजार १०७

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT