Mumbai Ganesh Festival Saam Tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेश मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’, ११ अटी पूर्ण केल्यावरच मिळणार जोडणी

Mumbai Ganesh Festival: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’ जारी करण्यात आली आहे.

Priya More
  • गणेशोत्सव २०२६ साठी बेस्टची वीज जोडणी मार्गदर्शक सूचना

  • मुंबईतील गणेश मंडळांसाठी बेस्टच्या वीज जोडणीच्या ११ अटी

  • मुंबई गणेश मंडळांसाठी BEST वीज कनेक्शनचे नवे नियम

  • गणेश मंडपासाठी वीज जोडणी घेताना कोणती कागदपत्रे आवश्यक

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर BEST कडून गणेश मंडळांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीचे नियम जारी करण्यात आले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजेच BEST दरवर्षी वीज पुरवठा करत असते. या गणेशोत्सव मंडपांना यावर्षी वीज जोडणी घेताना आवश्यक परवानग्या, विद्युत सुरक्षा, अर्ज प्रक्रिया, सुरक्षा ठेव, मीटर शुल्क आणि वीज दर यांची पूर्तता करावी लागेल. गणेशोत्सव मंडळांनी वीज पुरवठ्यासाठी बेस्टला अर्ज करण्यापूर्वी त्यांना नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. बेस्टकडून कोणत्या गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार हे आपण जाणून घेणार आहोत...

वीज आणि मीटर कनेक्शनसाठी अर्ज करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना शुल्क द्यावे लागणार आहे. सिंगल फेजच्या तात्पुरत्या जोडणीसाठी अर्ज करताना ९० रुपये कनेक्शन फी द्यावी लागणार तर थ्री फेजच्या अर्जासाठी १४५ रुपये कनेक्शन फी आकरली जाणार आहे. तसंच, ज्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध आहे तिथे सिंगल-फेज जोडणीसाठी १५० रुपये, तर थ्री-फेजसाठी २०० रुपये कनेक्शन फी आकारली जाणार आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष खर्च मंडळाकडून वसूल केला जाऊ शकतो.

गणेशोत्सव मंडळांनी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तात्पुरत्या वीज जोडणीचे बिल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग अर्थात MERCv ने मंजूर केलेल्या २०२६-२७ च्या दरपत्रकानुसारच आकारले जाणार आहे. ०- १०० युनिट वापरासाठी स्थिर शुल्क १३५ रुपये, ऊर्जा शुल्क २.०२ रुपये प्रति युनिट आणि वहन शुल्क १.८२ रुपये प्रति युनिट असणार आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी स्थिर शुल्क २०२.५० रुपये आणि ऊर्जा शुल्क ५.३४ रुपये प्रति युनिट आहे. ३०१ ते ५०० युनिटसाठी ऊर्जा शुल्क १०.०४ रुपये प्रति युनिट असेल. तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरासाठी स्थिर शुल्क २४० रुपये आणि ऊर्जा शुल्क ११.२५ रुपये प्रति युनिट असणार आहे.

११ अटी पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे -

- तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार.

- जागा मालकाची परवानगी, पालिका NOC आणि पोलिसांची परवानगी आवश्यक.

- विद्युत निरीक्षकाची परवानगी घेणेही बंधनकारक.

- कंत्राटदाराचा चाचणी अहवाल आणि ELCB अहवाल सादर करावा लागणार.

- चालू वीज बिल, हमीपत्र, NAFT फॉर्म आणि थकबाकी नसल्याचा अहवाल आवश्यक.

- अर्जात मंडळाचे नाव, पत्ता, वीज लागण्याचा कालावधी आणि जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल क्रमांक व बँक खात्याची माहिती द्यावी लागणार.

- मंडळाच्या शिक्क्यासह विद्युत सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणारे हमीपत्र आवश्यक.

- मंजुरीनंतर उर्वरित अनामत रक्कम जमा केल्यानंतरच वीजपुरवठा सुरू होणार.

- रस्ता किंवा फुटपाथवर मंडप असल्यास पालिका आणि संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी आवश्यक.

- परवानगी नसल्यास केवळ अर्जाची पावती ग्राह्य धरली जाणार नाही.

- विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक हमी नसल्यास वीजपुरवठा केला जाणार नाही.

- जमिनीवर तारा टाकणे आणि स्ट्रीट लाईटच्या खांबावर तारा गुंडाळण्यास BESTची स्पष्ट मनाई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार

आश्रमशाळेत संतापजनक प्रकार! २१ मुलींचा विनयभंग; दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Chocklate For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी चॉकलेट खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा चॉकलेट ठरेल फायदेशीर

Asif Khan doping case : क्रिकेटविश्वात खळबळ! अनुभवी फलंदाजावर १५ महिन्यांची बंदी, ४ वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई

Pune Crime: श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट, संतापलेल्या बापाने घेतला जीव; पुण्यातील भयानक घटना

SCROLL FOR NEXT