आसनगाव–कसारा चौथ्या रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी
मुंबई-नाशिक प्रवाशांना मोठा दिलासा
लोकल, मेल-एक्सप्रेस व मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका
एमयूटीपी-३ए अंतर्गत रेल्वे पायाभूत सुविधा विस्तार
Central Railway MUTP 3A project between Asangaon and Kasara latest update : कल्याण आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गानंतर, केंद्राने आता आसनगाव आणि कसारा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे मुंबई-नाशिक विभागात उपनगरीय स्थानिक लोकल तसेच मेल, एक्सप्रेस आणि मालवाहतूक गाड्यांसाठी कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला असून वाढीव लोकल फेऱ्या चालवण्याचा मार्गही उपलब्ध होणार आहे.
एमयूटीपी-३ए अंतर्गत, कल्याण ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या बांधकामाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प कल्याण ते आसनगाव आणि आसनगाव ते कसारा अशा दोन टप्प्यात राबवला जात आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून कल्याण ते आसनगाव तिसरी मार्गिका उभारण्यात येत आहे. नव्या मार्गिका उभारणीसाठी भूसंपादन सुरू आहे, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या स्थानकांदरम्यान गर्दीमुळे अनेकदा उपनगरीय सेवा लेट होतात आणि रद्द होतात, ज्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास होतो. लोकल खोळंबा टाळण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण ते कसारा आणि कर्जतदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याची मागणी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे केली होती.
३० डिसेंबर २०२५ रोजी कल्याण ते कर्जतदरम्यान अतिरिक्त दोन मार्गिका उभारण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली होती. सध्या या मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. कल्याण ते कर्जत आणि आसनगाव ते कसारा या नव्या मार्गिकांमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की पनवेल-वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरलाही लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने यापूर्वी एमयूटीपी-३बी हा तातडीचा सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.