अंधेरीत चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्या होत्या.
जे.पी. रोड परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
अपघातात एका कंडक्टरला दुखापत झाली आहे.
मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात विचित्र अपघात घडला. शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या BESTच्या चार बसेस एकमेकांवर आदळल्याने रस्तावर वाहतूक कोंडी झाली. या अपघातात एका बसमधील कंडक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. हा अपघात अंधेरी पश्चिमेतील जे.पी. रोड परिसरात आणि मेट्रो रेल्वेच्या पुलाखाली घडला.
ज्या ठिकाणी अपघात झाला तो भाग वर्दळीचा आहे. याच ठिकाणी अचानक एकामागोमाग चार बसेस धडकल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका बसने अचानक ब्रेक मारला आणि त्यानंतर काही क्षणांतच एकामागोमाग चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्या.
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक आणि मेट्रो प्रवाशांचे धास्तावले. बसेसची धडकेमुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने बसमधील कोणत्याच प्रवाशाला मोठी दुखापत झाली आहे. मात्र धडकेची तीव्रता मोठी असल्याने एका बसचा कंडक्टर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलीस आणि BEST प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त बसेस बाजूला केलं. यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र काही काळ या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. BESTच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्याने सध्या कार्यरत बसवर मोठा ताण असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
प्रवाशांचा वाढता भार, वेळेचे दडपण आणि सततची धावपळ यामुळे चालकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचेही बोलले जातंय. पोलीस आणि BEST प्रशासन अपघाताचे नेमके कारण शोधलं जातंय. तांत्रिक बिघाड, अचानक ब्रेक किंवा मानवी चूक यापैकी कोणते कारण यामागे होते, याचा तपास केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.