Mumbai Flood Update Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत पावसाचं रौद्ररूप! दादरमध्ये शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले; VIDEO व्हायरल

Mumbai Flood Update: मुंबईत मुसळधार पावसानं दादर, सायन, अंधेरीसह अनेक भाग पाण्याखाली गेले. अंधेरी सबवे चार फुट पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे. हवामान विभागानं पुढील ३ दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Bhagyashree Kamble

  • मुंबईत मुसळधार पावसानं दादर, सायन, अंधेरीसह अनेक भाग पाण्याखाली गेले.

  • अंधेरी सबवे चार फुट पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे.

  • हवामान विभागानं पुढील ३ दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर व सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात सर्वदूर मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईतही पावसानं धुमाकुळ घातला आहे. मुंबईसह नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पुढील ३ दिवसही जोरदार पाऊस बरसणार असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं दिला आहे. मुंबईतील दादरमध्ये पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळालं आहे. दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

दादरच्या सखल भागांत पावसानं झोडपून काढलं आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत शालेय विद्यार्थी जाताना दिसत आहे. यावेळी कार आणि दुचाकी पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दादरसह सायनमध्ये पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतूकीसाठी बंद आहे. अंधेरीत चार फुटापर्यंत पाणी भरले आहे. उपनगरातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागांत साचल्यानं मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.

पश्चिम उपनगरातील जयप्रकाश रोड, वीरा देसाई रोड, नवरंग सिनेमा या भागांत रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नागरिकांना वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पाण्यात अडकलेल्या शाळेच्या बसमधून मुलांची सुटका

माटुंगा पोलिस ठाण्याजवळ डॉन बॉस्को शाळेची बस पाण्यात अडकली. या बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी व चालक जवळपास एक तास अडकून पडले होते. जागरूक नागरिकांनी ही माहिती डीसीपी झोन ४ रागसुधा आर. यांना कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार व माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. केवळ दोन मिनिटांत सर्वांना सुरक्षित बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या प्रसंगानंतर मुलांना दिलेले बिस्कीट व पोलीस कर्मचाऱ्यांचे सांत्वन यामुळे त्यांची भीती दूर झाली. डीसीपी रागसुधा आर., वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलीस दलाच्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT