Mumbai Firing Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Firing : मुंबईत पुन्हा गोळीबार; मद्यधुंद अवस्थेत तरुणाकडून ५ ते ६ राऊंड फायर

Mumbai Firing News update : मुंबईत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. मुंबईच्या दिंडोशी भागात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने परवानाधारक बंदुकीतून अनेक राऊंड फायर केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गदडे, मुंबई

Mumbai Dindoshi Firing :

मुंबईत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. मुंबईच्या दिंडोशी भागात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने परवानाधारक बंदुकीतून अनेक राऊंड फायर केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या दिंडोशी गोकुळधाम परिसरात हा गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिंडोशी येथील गोकुळधाम परिसरातील हाई राइज इमारतीमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत परवानाधारक बंदुकीतून 5 ते 6 राऊंड फायर केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल आला. गोरेगाव गोकुळधाममध्ये एक व्यक्ती घराचा दरवाजा बंद करून आतून गोळीबार करत आहे. यानंतर दिंडोशी पोलिसांचे टीम घटनास्थळावर पोहोचली. राजीव रंजन हा तरुण मद्यधुंद अवस्थेत घराचा दरवाजा बंद करून आतून गोळीबार करत होता, असा दिसून आलं.

राजीव रंजन हा पत्नी निता रंजन आणि लहान मुलाला घरातून बाहेर काढून गोळीबार करत होता. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणारा आरोपी राजीव रंजन याला ताब्यात घेत त्याच्या घराची तपासणी केली. घरामध्ये पोलिसांना पती आणि पत्नीच्या नावावर असलेली २ परवानाधारक बंदूकीसोबत 10 ते 12 जिवंत काडतुसे आढळले.

पोलिसांकडून आरोपीला अटक

दिंडोशी पोलिसांनी राजीव रंजन याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीचा गैरवापर केल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दरम्यान, काही आठवड्यापूर्वी बोरिवलीत गोळीबाराची घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार करत स्वत:ला संपवलं. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एक गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT