Mumbai Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: दादरमधील फर्निचर दुकानाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

Furniture Store Caught Fire: अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणता यश आहे.

जयश्री मोरे

Dadar News: मुंबईच्या दादर शहरातून आगीची एक मोठी बातमी समोर आली आहे. काल (मंगळवार) रात्री दादरमधील एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या ५ वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. (Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आग लागली तेव्हा दुकान बंद असल्याने ही गोष्ट पटकन कुणाच्या लक्षात आली नाही. रात्री उशिरा दुकानातून धूर निघताना दिसताच स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

सुमारे 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणता आली. मात्र धुराचे लोट हवेत दूरवर पसरल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यास बराच वेळ लागला. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक आगीच्या कारणाचा शोध घेत आहे.

मुंबईत (Mumbai) आगीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. २५ मार्च रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. ही आग एवढी भीषण होती की त्यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकला आग लागली तेव्हा खूप उंचीपर्यंत धुराचे लोट दिसत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT