मुंबई DCC बँकेसाठी आज मतदान; 4 जागांसाठी 8 उमेदवार मैदानात Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई DCC बँकेसाठी आज मतदान; 4 जागांसाठी 8 उमेदवार मैदानात

या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 191 मतदार मतदान करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Mumbai District Central Co-operative Bank) निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज सकाळी मतदान केले. मुंबई बँकेतील एकूण 21 जागांपैकी 17 जागावर प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमधील सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उरलेल्या चार जागांसाठी आज निवडणूक (Election) होत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आठ उमदेवारांमध्ये चुरस आहे. या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 191 मतदार मतदान करणार आहेत.

आज सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. निवडणूक प्राधिकरणाने मतदानासाठी शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी. एस. हायस्कूलची निवड केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जात असून,मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक वर्षांपासूनन मुंबई बँकेच्या संचालकपदी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आहेत. आता देखील ते बिनविरोध निवडून आले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT