dharavi news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

mumbai Dharavi crime news : मुंबईच्या धारावीत गोळाीबार झाला. 32 वर्षीय तरुणीवर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या धारावीत गोळीबाराची घटना घडली आहे. धारावीच्या मुस्लिमनगरमध्ये एका तरुणीवर गोळीबार झाला. या गोळीबारात तरुणी जखमी झाली. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या धारावीतील मुस्लिमनगरमध्ये एका ३२ वर्षीय तरुणीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. सर्वर बानू शेख नावाच्या तरुणीवर गोळीबार झालाय. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. रात्रीच्या सुमारास तरुणी घराजवळ उभी असताना तिच्या दंडावर अचानक काही तरी आघात झाल्याने महिला जखमी झाली.

जखमी झालेल्या तरुणीला तातडीने सायन रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीच्या दंडात गोळी घुसल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राज्यासहित मुंबईतही गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. वाढत्या महिला अत्याचारादरम्यान एका तरुणीवर गोळीबाराची घटना घडली आहे. तरुणीवर नेमकं कुणी गोळीबार केला, याची माहिती हाती आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. तरुणीवर गोळीबार झाल्याने धारावी परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली होती. आमदार शंकर मांडेकर यांच्या सख्ख्या भावाने गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झालं नव्हतं. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT