Mumbai Dahi Handi 2025 Saam tV news
मुंबई/पुणे

मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ३० गोविंदा गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

Mumbai Dahi Handi 2025: राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सवात मोठा जल्लोष सुरू असताना अपघात घडला. आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत. मानखुर्दमध्ये ३२ वर्षीय जगमोहन चौधरी या गोविंदाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सवात मोठा जल्लोष सुरू असताना अपघात घडला.

  • आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत.

  • मानखुर्दमध्ये ३२ वर्षीय जगमोहन चौधरी या गोविंदाचा दुर्देवी मृत्यू झाला.

  • जखमींवर सायन, KEM आणि नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सव शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. १० थरांचे उंच मनोरे पाहायला मिळत आहे. या उत्सवाचा जल्लोष द्विगुणित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय नेते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले आहेत. मात्र, या उत्सवाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ३० गोविंदा जखमी झाले आहेत. तसेच मानखूर्दमध्ये एका गोविंदाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मुंबईत दहीहंडी उत्सवात ३० गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. विविध सरकारी तसेच बीएमसी रूग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत. १५ गोविंदांवर खासगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, १५ गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन रूग्णालयात १८, KEM रूग्णालयात ६ आणि नायर रूग्णालयात ६ गोविंदांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईच्या मानखूर्दमध्ये एका गोविंदाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जगमोहन शिवकिरण चौधरी (वय वर्ष ३२) या तरूणाचा दहीहंडीसाठी दोरी बांधताना तोल गेला आणि थेट खाली कोसळला. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तरूणाला मृत घोषित केले.

तरूणाच्या मृत्यूनंतर उत्सवाला गालबोट लागला असून, चौधरी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT