Mumbai Dadar Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Kabutar Khana : वाद पुन्हा तापणार! दादरमधील कबुतरखान्यावर पुन्हा ताडपत्री लावली, जैन समाज आक्रमक, पोलीस बंदोबस्त वाढवला

Mumbai Dadar : दादर येथील कबूतर खान्यावर महापालिकेने पुन्हा ताडपत्री टाकल्याने जैन समाजाचा विरोध तीव्र झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • दादर कबूतर खानावर महापालिकेने पुन्हा ताडपत्री टाकली

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जैन समाज आक्रमक

  • पोलिसांनी तणाव टाळण्यासाठी बंदोबस्त तैनात केला

  • धार्मिक परंपरा आणि कायदेशीर अंमलबजावणी यात संघर्ष वाढला

दादर येथील कबूतर खाना परिसर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. कबुतर खानावर काही दिवसांपूर्वी ताडपत्री टाकण्यात आली होती. मात्र जैन समाजाकडून या निर्णयावर विरोध दर्शवण्यात आला होता. असं असलं तरी पुन्हा एकदा रात्री उशिरा मुंबई महापालिकेकडून कबुतर खानावर ताडपत्री बसवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार कबूतर खान्यात कबुतरांना धान्य दिल्यास ते गुन्हा मानले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानंतर जैन समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून कबूतर खान्यावर ताडपत्री टाकण्याच्या महापालिकेच्या कृतीविरोधात समाज आक्रमक झालेला दिसून येतो. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कबूतर खान्यावर ताडपत्री टाकली होती मात्र जैन समाजातील कार्यकर्त्यांनी ती तातडीने काढून टाकत आपला विरोध नोंदवला होता.

मात्र या प्रकरणात नव्या घडामोडी घडल्या असून रात्री उशिरा मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कबूतर खान्यावर ताडपत्री टाकण्याचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर जैन समाजाकडून संभाव्य आक्रमक प्रतिक्रिया टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीमुळे वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जैन समाजाच्या मते, कबुतरांना धान्य देणे ही त्यांच्या धार्मिक परंपरेचा भाग असून, ते सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. एकीकडे ते कबुतरांना धान्य देण्याची मुभा मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांच्या मंदिरांवर जाळ्या लावण्याचे कामही सुरू आहे. जेणेकरून कबुतरांचा वावर मंदिरांच्या आत कमी होईल. या दुहेरी भूमिकेबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणाव वाढत असून महापालिका, पोलिस प्रशासन आणि जैन समाज यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि जैन समाजाच्या भूमिका यांचा तोल कसा साधला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT