Kabutarkhana, Dadar, Jain community protest Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mumbai Kabutarkhana : कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये राडा, जैन समाज आक्रमक, शेकडो आंदोलक रस्त्यावर | VIDEO

Dadar Kabutarkhana controversy full details : कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये जोरदार राडा झाला आहे. जैन समाज आक्रमक झाला असून मुंबई महानगरपालिकेने टाकलेली ताडपत्री हटवली आहे.

Namdeo Kumbhar

  • दादर पश्चिमेतील कबुतरखाना हटवण्यावरून मोठा वाद

  • बीएमसीने टाकलेली ताडपत्री जैन समाजाने हटवली

  • धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आंदोलन

  • परिसरात तणाव, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला

Kabutarkhana, Dadar, Jain community protest, : कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये जोरदार राडा झाला आहे. जैन समाज आक्रमक झाला असून मुंबई महानगरपालिकेने टाकलेली ताडपत्री हटवली आहे. स्थानिक नागरिक आणि जैन समाजातील कार्यकर्त्यांनी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि ताडपत्री फाडून टाकली. यावेळी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. दादरमध्ये शेकडो लोक जमले असून आंदोलन केले जात आहे. (Why is Jain community protesting in Dadar?)

दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना परिसरात बीएमसीने कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्यासाठी ताडपत्री टाकली होती. यामुळे स्थानिक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी ताडपत्री हटवून निषेध केला. जैन समाजासाठी कबुतरांना खाद्य देणे हा धार्मिक प्रथेचा भाग आहे. बीएमसीच्या कारवाईमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटलेय.

नेमकं काय घडलं?

दादरमधील कबूतरखाना परिसरात जैन समाजाने आज आंदोलन करण्याची योजना आखली होती, परंतु हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरीही मोठ्या संख्येने जैन समाजाचे लोक कबूतरखाना परिसरात जमले. त्यांनी महापालिकेने लावलेली ताडपत्री काढली आणि कबुतरांना दाणे टाकले. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आक्रमक झाले, आणि जैन समाज व आंदोलकांमध्ये झटापट सुरू आहे.

कोर्टाने काय सांगितले होतं?

हायकोर्टाच्या आदेशानुसार, महापालिकेने दादरमधील कबूतरखाना बंद केला होता. मात्र, बंदीनंतरही काही लोक मनाई आदेशाचे उल्लंघन करून कबूतरांना धान्य टाकत असल्याचे निदर्शनास आले. यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत धान्य टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, महापालिकेने कबूतरखान्यावर ताडपत्री टाकली, जेणेकरून लोक धान्य टाकू नयेत आणि कबूतरे तिथे बसू नयेत.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कबुतरखान्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. यामुळे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, जैन समाजाने याला धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा बनवत बीएमसीच्या कारवाईला विरोध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

SCROLL FOR NEXT