MUMBAI CYBER POLICE BUST INTERSTATE FRAUD GANG LINKED TO 3,206 ONLINE SCAM CASES saam tv
मुंबई/पुणे

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Cyber Crime Network Busted: मुंबई सायबर गुन्हे शाखेने देशभरातील ३,२०६ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. झारखंड, बिहार आणि दिल्लीतून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • 3,206 ऑनलाइन फसवणूक प्रकरणांशी संबंधित आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

  • झारखंड, बिहार आणि दिल्ली येथून सहा आरोपींना अटक करण्यात आली.

  • महाराष्ट्रातील 517 आणि मुंबईतील 93 गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग

संजय गडदे,साम प्रतिनिधी

मुंबई सायबर गुन्हे शाखेने बनावट APK फाईलच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत झारखंड, बिहार आणि दिल्ली येथून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून देशभरातील तब्बल 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 517 तर मुंबईतील 93 गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदाराला महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने ‘MGL GAS UNBLOCK FILE.apk’ ही बनावट APK फाईल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात आले होते. फाईल इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील बँकिंग माहिती चोरून तक्रारदाराची 2 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन झारखंड, बिहार आणि दिल्ली येथे छापे टाकण्यात आले. अटक आरोपींकडून 11 मोबाईल फोन, 9 लॅपटॉपसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तपासात विविध बँकांच्या, आरटीओ तसेच महानगर गॅसच्या नावाने तयार करण्यात आलेल्या 999 बनावट APK फाईल्स आढळून आल्या.

याशिवाय आरोपींच्या ताब्यातून व्हॉट्सअॅप व टेलिग्राम ग्रुप, टेलिग्राम बॉट, सर्व्हर पॅनल लॉगिन क्रेडेन्शियल्स, URL तसेच Google Firebase आणि Hostinger सर्व्हरवरील सुमारे 1.24 कोटी एसएमएस रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. सुमारे 8609 मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड माहिती, पिन, यूपीआय आयडी यासारखी संवेदनशील माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.

सायबर पोलिसांनी नोंदविलेल्या डेटाचे आणि एनसीआरपी पोर्टलवरील तक्रारींचे विश्लेषण केले असता देशभरातील 3206 गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यांमधील फसवणुकीची रक्कम 43 कोटी 25 लाख रुपयांहून अधिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून सुरू असून संबंधित राज्यांतील पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई देवेन भारती पोलीस सह आयुक्त गुन्हे अनिल होऊन कुंभारे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे कृष्णकांत उपाध्याय पोलीस उप आयुक्त बजरंग बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे सपोनी नितीन गच्चे, स पो नी धनवेश पाटील, सपोनी विजय घोरपडे पोलीस उपनिरीक्षक दीपक तायडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश खुशलानी, पोलीस हवालदार सचिन सावंत प्रशांत भुवड महेंद्र तावडे, पोलीस शिपाई विकास दिघे संग्राम जाधव सुरेश लोकरे अमोल फाफळे मयूर इंगळे ओमकार शिंदे अनिल वारे यांनी पार पडली.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई देवेन भारती पोलीस सह आयुक्त गुन्हे अनिल होऊन कुंभारे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे कृष्णकांत उपाध्याय पोलीस उप आयुक्त बजरंग बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे सपोनी नितीन गच्चे, स पो नी धनवेश पाटील, सपोनी विजय घोरपडे पोलीस उपनिरीक्षक दीपक तायडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश खुशलानी, पोलीस हवालदार सचिन सावंत प्रशांत भुवड महेंद्र तावडे, पोलीस शिपाई विकास दिघे संग्राम जाधव सुरेश लोकरे अमोल फाफळे मयूर इंगळे ओमकार शिंदे अनिल वारे यांनी पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळेल दिलासा

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT