Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Vasai Crime News : चोर सोडून सन्याशाला फाशी! पोलिसांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन इंगळे

Crime News : वसईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीतील मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर दुसऱ्याच कर्मचाऱ्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. सतत होणाऱ्या चौकशीला आणि पोलिसांच्या जाचला कंटाळून अखेर कंपनी कर्मचाऱ्याने त्याच्या कंपनीमध्येच स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत. (Vasai Police)

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या भोईदा पाडा येथील कंपनीत काम करणारे एक प्रेमीयुगुल पळून गेल आहे. ज्या दिवशी ते पळून गेले त्याच दिवशी कंपनीत काम करणारा मयत मंजीत यादव हा गावाकडे जायला निघाला होता. मंजीत रेल्वे स्थानकात गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जावेद आणि त्याच्यासोबत पळून गेलेली मुलगी याबाबत चौकशी केली.

मात्र मंजीतला या बाबत कोणतीही माहिती नसल्याने त्याने पोलिसांना काहीच सांगितले नाही. त्यानंतर मंजीतला पोलिसांनी त्याच्या कंपनीत घुसून मारहाण केली. मारहाणीचे दृश्य सिसिटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले असून नातेवाईकांचा असा आरोप आहे की, पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडून पैसे काढून घेतले. असे एकदा नव्हे तर तीन वेळा घडले.

मंजीतला पोलीस ठाण्यात घेऊन जात जर माहिती नाही दिली तर पुन्हा मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मंजीतने गावी पैसे मागितले मात्र पैसे मिळत नसल्याने शेवटी त्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली, असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याच कंपनीत काम करणाऱ्या मंजीतला ताब्यात घेतलं. त्याला दोन ते तीन वेळा कंपनीतून पोलिसांनी नेल्याचं त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं आहे. दरम्यान नायगाव पोलिसांना या संदर्भात विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

आत्महत्या की हत्या?

मंजीतच्या अंगावर रक्ताचे डाग होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप मंजीतच्या नातेवाईकांनी केला असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT